पराभवानंतर पेसकडून दिवीज-पुरवची प्रशंसा

पीटीआय
Friday, 6 January 2017

चेन्नई - भारताचा दुहेरीतील दिग्गज टेनिसपटू लिअँडर पेस याने चेन्नई ओपन एटीपी टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीतील पराभवानंतर दिवीज शरण-पुरव राजा या देशबांधवांच्या जोडीची प्रशंसा केली.

पेसने ब्राझीलच्या आंद्रे सा याच्या साथीत भाग घेतला होता. त्यांचा ४-६, ४-६ असा पराभव झाला. पेस म्हणाला, की आज आमची सुरवात चांगली झाली नाही. प्रतिस्पर्धी जोडीने खास करून दिवीजने चांगला खेळ केला. त्याचे फर्स्ट सर्व्हवरील सातत्य जास्त होते.

पेसने सेंट पीटर्सबर्गमधील स्पर्धेत या जोडीला हरविले होते. त्या तुलनेत त्यांचा खेळ उंचावल्याचे पेसने नमूद केले. पेसने येथे सहा वेळा विजेतेपद मिळविले आहे. या स्पर्धेतील तो सर्वाधिक यशस्वी खेळाडू आहे. त्याने सांगितले, की चेन्नईच्या कोर्टवर लिअँडरला हरविणे सोपे नसते; पण त्यांनी डावपेच पक्के आखले होते. ते वैशिष्ट्यपूर्ण खेळ करतात. त्यांची जोडी चांगली जमली आहे.
दिवीज-पुरव यांनी ६७ मिनिटांतच सामना जिंकला. आंद्रे हा पेसचा १११वा जोडीदार होता; पण त्याच्या साथीत पेसला नेहमीच्या शैलीत खेळ करता आला नाही. दिवीज-पुरव यांच्यासाठी मागील मोसम फलदायी ठरला. त्यांनी चार चॅलेंजर विजेतीपदे मिळविली. जागतिक क्रमवारीत त्यांनी पहिल्या ७० जणांमध्ये प्रवेश मिळविला आहे. मायदेशातील या स्पर्धेत तिसऱ्या विजेतेपदाची मोहीम त्यांनी धडाक्‍यात सुरू केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After the defeat paes provides Divi-purav