अँडी मरेच्या विंबल्डन सहभागाबाबत अनिश्चितता

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 जून 2018

मागील वर्षी मांडीला झालेल्या दुखापतीमुळे तब्बल एक वर्ष मैदानाबाहेर असलेल्या अँडी मरे याने सोमवारी स्टॅन वाव्रिंकाला 6-1, 6-3 असे पराभूत करत टेनिस कोर्टवर पुनरागमन केले. 

लंडन : मागील वर्षी मांडीला झालेल्या दुखापतीमुळे तब्बल एक वर्ष मैदानाबाहेर असलेल्या अँडी मरे याने सोमवारी स्टॅन वाव्रिंकाला 6-1, 6-3 असे पराभूत करत टेनिस कोर्टवर पुनरागमन केले. 

गतवर्षी विंबल्डनमध्ये शेवटचा सामना खेळलेला अँडी मरे याने नेचर व्हॅली आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत 77 मिनिटांमध्ये स्टॅन वाव्रिंकावर विजय मिळवला. यावर्षीच्या विंबल्डन सहभागाबद्द्ल विचारणा केली असता, पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने यंदा होणाऱ्या विंबल्डन खेळण्याचा निर्णय अजून घेतला नसल्याचे त्याने स्पष्ट केले. 

वाव्रिंकाला पराभूत केल्यानंतर मरे म्हणाला, ''मी तयार आहे की नाही हे मी ठरवेल, मी सध्या स्वत:वर दबाव देत नाही आहे. एवढ्या मोठ्या दुखापतीतून सावरणे हे सोपे नसते, माझ्या प्रकृतीला माझे प्रथम प्राधान्य आहे.''   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Andy Murray is not sure about wimbledon participation