esakal | टेनिसपटू अंकिता ‘टॉप्स’मध्ये

बोलून बातमी शोधा

Ankita Raina
टेनिसपटू अंकिता ‘टॉप्स’मध्ये
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली - भारताची एकेरीतील अव्वल टेनिसपटू अंकिता रैना हिचा अखेर केंद्र सरकारच्या खेळाडूंसाठी आर्थिक निधीच्या योजनेत समावेश झाला. ‘टार्गेट ऑलिंपिक पोडीयम’ (टॉप) या योजनेसाठी तिला डावलण्यात आले होते.

त्यानंतर फेडरेशन करंडकासह तिने व्यावयासिक स्पर्धांत सातत्याने सरस कामगिरी केली. जागतिक क्रमवारीत निरुपमा वैद्यनाथन आणि सानिया मिर्झा यांच्यानंतर तिने पहिल्या २०० जणींत अलीकडेच स्थान मिळविले.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) ट्‌विट करीत अंकिताला शुभेच्छा दिल्या. अंकिताने १९४व्या क्रमांकापर्यंत मजल मारली. अंकिता २५ वर्षांची आहे. पुण्यात पीवायसी हिंदू जिमखान्यावर ती हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. यानंतर तिने पहिल्या १५० क्रमांकांत स्थान मिळविण्याचे ध्येय ठेवले आहे.

देशाचा लौकिक उंचावण्याचे माझे ध्येय आहे. देशासाठी खेळतानाच माझी सर्वोत्तम कामगिरी झाली आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी मी प्रयत्नात कदापि कमी पडणार नाही.
- अंकिता रैना