esakal | नदाल उपांत्यपूर्व फेरीत

बोलून बातमी शोधा

नदाल उपांत्यपूर्व फेरीत
नदाल उपांत्यपूर्व फेरीत
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा
फ्रान्सच्या मॉंफिसवर मात, आता मिलॉसचे आव्हान
मेलबर्न - स्पेनच्या रॅफेल नदाल याने ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याने फ्रान्सच्या गेल मॉंफिसवर 6-3, 6-3, 4-6, 6-4 अशी मात केली. त्याच्यासमोर मिलॉस राओनीच याचे आव्हान असेल.

नोव्हाक जोकोविच आणि अँडी मरे यांच्या पराभवानंतर नदालची संधी वाढली आहे. कट्टर प्रतिस्पर्धी रॉजर फेडरर त्याच्या ड्रॉमध्ये नाही. त्यामुळे नदाल विरुद्ध फेडरर अशी ड्रीम फायनल होण्याची शक्‍यता अचानक निर्माण झाली आहे. त्यादृष्टिने नदालने एक टप्पा पार केला.

मिलॉस विजयी
कॅनडाच्या मिलॉस राओनीचने अर्जेंटिनाच्या रॉबर्टो बौटीस्टा आगुटवर 7-6 (8-6), 3-6, 6-4, 6-1 असा विजय मिळविला. त्याने सलग तिसऱ्या वर्षी उपांत्यपूर्व फेरी गाठली. टायब्रेकमध्ये त्याने 1-5 अशी पिछाडी भरून काढली. त्याने 33 एस आणि 75 वीनर्स मारले.

गॉफीन-ग्रिगॉर लढत
ग्रिगॉर दिमीत्रोवने उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याने नोव्हाक जोकोविचला हरविलेल्या डेनिस इस्तोमीनची घोडदौड 2-6, 7-6 (7-2), 6-2, 6-1 अशी रोखली. इस्तोमीनला पहिला सेट जिंकल्यानंतर कंबरेच्या दुखापतीने त्रस्त केले. ग्रिगॉरसमोर डेव्हिड गॉफीनचे आव्हान असेल. त्याने ऑस्ट्रेलियाच्या डॉमनिक थिएमचे आव्हान 5-7, 7-6 (7-4), 6-2, 6-2 असे परतावून लावले. गेल्या वर्षी गॉफीनले फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत थिएमेने हरविले होते.

सेरेनाची सरशी
महिला एकेरीत सेरेना विल्यम्सने उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिने बार्बरा स्ट्रीकोवाचे आव्हान 7-5, 6-4 असे परतावून लावले. सेरनासमोर आता ब्रिटनच्या योहाना कॉंटाचे आव्हान असेल. नवव्या मानांकित कॉंटाने 30व्या मानांकित रशियाच्या एकातेरिना माकारोवाला 6-1, 6-4 असे हरविले. 25 वर्षांच्या कॉंटाने 69 मिनिटांत विजय मिळविला. लढतीच्या वेळी 35 अंश सेल्सिअस तापमान होते. दुसऱ्या सेटमध्ये माकारोवाने 4-1 अशी आघाडी घेतली होती, पण कॉंटाने सलग पाच गेम जिंकले. दुसऱ्या मॅटपॉइंटला तिने विजय नक्की केला.

कॅरोलिनाची आगेकूच
चेक प्रजासत्ताकाच्या कॅरोलिना प्लिस्कोवाने कारकिर्दीत प्रथमच येथे उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिने ऑस्ट्रेलियाच्या डॅरिया गाव्रीलोवाला 6-3, 6-3 असे हरविले. तिच्यासमोर मिर्याना ल्युचिच-बॅरोनीचे आव्हान असेल. मिर्यानाने स्वप्नवत आगेकूच कायम राखली. तिने अमेरिकेच्या जेनीफर ब्रॅडीला 6-4, 6-2 असे पराभूत केले.

पुरुष एकेरी - उपांत्यपूर्व सामने
मिशा झ्वेरेव वि. रॉजर फेडरर
स्टॅन वॉव्रींका वि. ज्यो-विल्फ्रीड त्सोंगा
मिलॉस राओनीच वि. रॅफेल नदाल
डेव्हिड गॉफीन-ग्रिगॉर दिमीत्रोव