'चिटर' शारापोवावर टाका कायमची बंदी : युजेनी

वृत्तसंस्था
Friday, 28 April 2017

"डब्ल्यूटीए'चे प्रमुख स्टीव सायमन यांनी "टूर'वरील स्पर्धांमध्ये शारापोवाला "वाइल्ड कार्ड' देण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

इस्तंबूल - ड्रग टेस्टमध्ये दोषी आढळलेल्या मारिया शारापोवाला वाइल्ड कार्डद्वारे पुनरागमनाची संधी दिल्याबद्दल कॅनडाची टेनिसपटू युजेनी बुशार्ड हिने महिला टेनिस संघटनेवर (डब्ल्यूटीए) टीका केली आहे. शारापोवा "चिटर' असून तिच्यावर कायमची बंदी घालायला हवी, अशी तीव्र प्रतिक्रिया तिने व्यक्त केली. 

युजेनीने सांगितले की, हे काही योग्य आहे असे मला वाटत नाही. ती "चिटर' असून "चिटर'ला कोणत्याही खेळात पुन्हा खेळण्याची संधी देऊ नये. हे इतर सर्व खेळाडूंच्यादृष्टिने अन्यायकारक आहे. त्यामुळे नवोदित खेळाडूंना चुकीचा संदेश जात आहे. फसवा आणि तरीही तुमचे सहर्ष स्वागत केले जाईल असाच हा संदेश आहे. मी काही आता आदर्श म्हणून शारापोवाकडे पाहात नाही. तिच्या या प्रतिमेला नक्कीच थोडा धक्का बसला आहे.' युजेनी 23 वर्षांची आहे. जागतिक क्रमवारीत ती 59व्या स्थानावर आहे. यापूर्वी पोलंडच्या ऍग्निस्का रॅडवन्स्का हिने सुद्धा शारापोवाला फ्रेंच आणि विंबल्डन या ग्रॅंड स्लॅम स्पर्धांसाठी "वाइल्ड कार्ड' मिळता कामा नये, असे स्पष्ट मत व्यक्त केले होते. 

"डब्ल्यूटीए'चे प्रमुख स्टीव सायमन यांनी "टूर'वरील स्पर्धांमध्ये शारापोवाला "वाइल्ड कार्ड' देण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bouchard: 'Cheater' Sharapova should be banned for life