चिलीचची पाचव्या स्थानावर घसरण

वृत्तसंस्था
Tuesday, 8 May 2018

रॅफेल नदाल अव्वल स्थानी कायम राहिला असून, बल्गेरियाचा ग्रिगॉर दिमित्राव याला न खेळता चौथे स्थान मिळाले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या इस्तंबूल टेनिस स्पर्धेत दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागल्याने चिलिचला चौथे स्थान गमवावे लागले.

पॅरिस - क्रोएशियाचा टेनिसपटू मरिन चिलीच याची टेनिस क्रमवारीत पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. टेनिस संघटनेच्या वतीने सोमवारी नवी मानांकन यादी जाहीर करण्यात आली.

रॅफेल नदाल अव्वल स्थानी कायम राहिला असून, बल्गेरियाचा ग्रिगॉर दिमित्राव याला न खेळता चौथे स्थान मिळाले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या इस्तंबूल टेनिस स्पर्धेत दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागल्याने चिलिचला चौथे स्थान गमवावे लागले.

मानांकन यादी -
1) रॅफेल नदाल 
2) रॉजर फेडरर
3) ऍलेक्‍झांडर झ्वेरेव
4) ग्रिगॉर दिमित्राव
5) मरिन चिलीच
6) ज्युआन मार्टिन डेल पोर्टो
7) डॉमिनिक थिएम
8) केविन अँडरसन
9) जॉन इस्नर
10) डेव्हिड गॉफिन.  
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chile Falling on fifth position