जोकोविच पुन्हा टॉप टेनमध्ये

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 जुलै 2018

विंबल्डन विजेतेपदासह सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने जागतिक क्रमवारीत पुन्हा टॉप टेनमध्ये प्रवेश केला आहे. जोकोविच याआधी 11व्या क्रमांकावर होता. आठ महिन्यांच्या खंडांनंतर त्याने पुन्हा टॉप टेनमध्ये स्थान मिळविले. अंतिम फेरी गाठलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनने तीन क्रमांक प्रगती केली. तो आठवरून पाचवर गेला. स्पेनच्या रॅफेल नदालने अव्वल स्थान कायम राखले आहे.

लंडन - विंबल्डन विजेतेपदासह सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने जागतिक क्रमवारीत पुन्हा टॉप टेनमध्ये प्रवेश केला आहे. जोकोविच याआधी 11व्या क्रमांकावर होता. आठ महिन्यांच्या खंडांनंतर त्याने पुन्हा टॉप टेनमध्ये स्थान मिळविले. अंतिम फेरी गाठलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनने तीन क्रमांक प्रगती केली. तो आठवरून पाचवर गेला. स्पेनच्या रॅफेल नदालने अव्वल स्थान कायम राखले आहे.

उपांत्य फेरीत तो जोकोविचकडून हरला. त्याचा मुख्य प्रतिस्पर्धी रॉजर फेडरर उपांत्यपूर्व फेरीत अँडरसनविरुद्ध हरला. त्यामुळे फेडररची पिछाडी वाढली आहे. अँडरसनकडून उपांत्य फेरीत हरलेल्या जॉन इज्नरने दोन क्रमांक प्रगती करीत आठवे स्थान गाठले. महिला एकेरीत सेरेना विल्यम्सने अंतिम फेरीतील प्रवेशामुळे तब्बल 153 क्रमांक आगेकूच केली. ती 28व्या स्थानावर गेली. विजेत्या अँजेलिक केर्बरने सहा क्रमांक प्रगती करीत चौथे स्थान गाठले. सिमोना हालेप चौथ्याच फेरीतील पराभवानंतरही अव्वल स्थानी कायम राहिली.

Web Title: Djokovic again in the top ten