दुबई टेनिस स्पर्धेच्या दुहेरीत बोपण्णा-मॅटकोवस्की उपांत्य फेरीत

पीटीआय
Friday, 3 March 2017

दुबई - यंदाच्या मोसमातील चौथा सहकारी मार्सिन मॅटकोवस्कीच्या साथीत रोहन बोपण्णाने दुबई टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. बिगरमानांकित बोपण्णा-मॅटकोवस्की जोडीने रुमानियाचा फ्लोरिन मर्जेआ आणि सर्बियाचा व्हिक्‍टर ट्रॉइचकी जोडीचा ६-३, ६-४ असा पराभव केला. स्पर्धेत यापूर्वी बोपण्णा-मॅटकोवस्की यांनी द्वितीय मानांकित इवान डोडिंग-मार्सल ग्रॅनोलर्स यांचा पराभव केला आहे. आता त्यांची गाठ पेस-गुलेर्मो गार्सिया लोपेझ आणि डॅनिएल नेस्टर-एडुआर्ड रॉजर व्हॅसेलिन यांच्याशी पडेल.

दुबई - यंदाच्या मोसमातील चौथा सहकारी मार्सिन मॅटकोवस्कीच्या साथीत रोहन बोपण्णाने दुबई टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. बिगरमानांकित बोपण्णा-मॅटकोवस्की जोडीने रुमानियाचा फ्लोरिन मर्जेआ आणि सर्बियाचा व्हिक्‍टर ट्रॉइचकी जोडीचा ६-३, ६-४ असा पराभव केला. स्पर्धेत यापूर्वी बोपण्णा-मॅटकोवस्की यांनी द्वितीय मानांकित इवान डोडिंग-मार्सल ग्रॅनोलर्स यांचा पराभव केला आहे. आता त्यांची गाठ पेस-गुलेर्मो गार्सिया लोपेझ आणि डॅनिएल नेस्टर-एडुआर्ड रॉजर व्हॅसेलिन यांच्याशी पडेल. चेन्नई ओपन स्पर्धेत जीवन नेंदूचेझियनच्या साथीत विजेतेपद पटकाविल्यानंतर बोपण्णाची यंदाच्या मोसमातील ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dubai Tennis Championships