इटलीच्या फॉग्नीनीचा निशीकोरीला धक्का

पीटीआय
Friday, 31 March 2017

मायामी, फ्लोरिडा - इटलीच्या फॅबिओ फॉग्नीनी याने मायामी ओपन मास्टर्स टेनिस स्पर्धेत सनसनाटी निकाल नोंदविला. त्याने जपानच्या केई निशीकोरीचे आव्हान ६-४, ६-२ असे संपुष्टात आणले.

निशीकोरीला द्वितीय मानांकन होते. संपूर्ण सामन्यात निशीकोरीच्या खेळात शैथील्य होते. त्यामुळे फॉग्नीनी पकड कायम राखू शकला. या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठलेला फॉग्नीनी हा २००७ नंतर पहिला बिगरमानांकित स्पर्धक ठरला. तो २९ वर्षांचा आहे. त्याने तासाभरात कारकिर्दीतील महत्त्वाचा विजय संपादन केला.

नदालची सॉकवर मात
स्पेनचा मातब्बर स्पर्धक रॅफेल नदाल याने आगेकूच केली. त्याने अमेरिकेच्या जॅक सॉक याच्यावर ६-२, ६-३ अशी मात केली. सॉकला तेरावे मानांकन होते. नदालने एक तास २३ मिनिटांत सामना जिंकला. त्याने कारकिर्दीत सॉकविरुद्ध तिन्ही सामने जिंकले आहेत.

पहिल्या सेटमध्ये नदालने जोरदार खेळ केला. त्याने पहिले तीन गेम जिंकले होते. दुसऱ्या सेटमध्ये नदालने ०-२, १५-४० अशा पिछाडीवरून बाजी मारली. नदालची आता फॉग्नीनी याच्याविरुद्ध लढत होईल. नदाल आणि फॉग्नीनी यांच्यात आतापर्यंत दहा लढती झाल्या आहेत. त्यात नदालने सात विजय मिळविले आहेत; पण गेल्या सहा लढतींमध्ये ३-३ अशी बरोबरी आहे. नदालने सांगितले, की आम्हा दोघांना एकमेकांचा खेळ चंगला ठाऊक आहे. त्याने मला काही वेळा हरविले आहे. त्यामुळे हा सामना खडतर होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fabio Fognini