जर्मनीच्या अलेक्‍झांडरविरुद्ध स्पेनचा फर्नांडो ‘दी ग्रेट’!

पीटीआय
Wednesday, 31 May 2017

पॅरिस - स्पेनचा ‘क्‍ले कोर्ट स्पेशालिस्ट’ फर्नांडो व्हरडॅस्को याने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत सनसनाटी निकाल नोंदविला. त्याने नवव्या मानांकित जर्मनीच्या अलेक्‍झांडर झ्वेरेव याच्यावर पहिल्याच फेरीत ६-४, ३-६, ६-४, ६-२ अशी मात केली.

अलेक्‍झांडर २० वर्षांचा आहे. नव्या पिढीतील प्रतिभासंपन्न खेळाडूंमध्ये त्याची गणना होते. गेल्याच आठवड्यात त्याने रोममधील स्पर्धेत नोव्हाक जोकोविचला हरविले होते. या स्पर्धेत तो मोठी मजल मारण्याची अपेक्षा होती. काल हा सामना पावसामुळे अर्धवट राहिला होता. आज ३३ वर्षांच्या डावखुऱ्या फर्नांडोने त्याला जेरीस आणले.

वॉव्रींका विजयी
२०१५चा विजेता स्टॅन वॉव्रींका याने स्लोव्हाकियाच्या जोझेफ कोवालीकवर ६-२, ७-६ (८-६), ६-३ अशी मात केली. जागतिक क्रमवारीत कोवालिक १५२व्या स्थानावर आहे. त्याने पात्रता फेरीतून आगेकूच केली होती. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या वॉव्रींकाला दुसऱ्या सेटमध्ये थोडे झगडावे लागले. त्याने ३८ ‘वीनर्स’ मारले.

मरे, निशीकोरीचा संघर्ष
अग्रमानांकित अँडी मरे आणि आठवा मानांकित केई निशीकोरी यांना संघर्ष करावा लागला. मरेने रशियाच्या आंद्रे कुझ्नेत्सोवचे आव्हान ६-४, ४-६, ६-२, ६-० असे परतावून लावले. निशीकोरीलासुद्धा एक सेट गमवावा लागला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या थानासी कोक्कीनाकीस याला ४-६, ६-१, ६-४, ६-४ असे पराभूत केले.

किर्गीऑसचा संयम
ऑस्ट्रेलियाच्या नीक किर्गीऑसने जर्मनीच्या फिलिप कोलश्‍क्रायबरला ६-३, ७-६ (७-४), ६-३ असे हरविले. किर्गीऑसच्या कंबरेला गेल्या आठवड्यात दुखापत झाली होती, पण त्याचा काहीही परिणाम जाणवला नाही. मुख्य म्हणजे त्याने भावनासुद्धा नियंत्रणात ठेवल्या. २२ वर्षांच्या किर्गीऑसला १८वे मानांकन आहे. तो अत्यंत प्रतिभासंपन्न मानला जातो. त्याने एकूण २० ‘एस’ मारले. किर्गीऑसने इतकी वर्षे ‘सुपर कोच’ नेमला नव्हता. त्याने अलीकडेच फ्रान्सचे माजी टेनिसपटू सेबॅस्टियन ग्रॉसजाँ यांची नियुक्ती केली आहे.

डेल पोट्रोचा लढा
अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोट्रो याने देशबांधव गुईडो पेल्ला याच्यावर ६-२, ६-१, ६-४ अशी मात केली. तो पाच वर्षांच्या खंडानंतर सहभागी झाला आहे. खांदा आणि पाठीच्या दुखापतींमुळे डेल पोट्रोचा सहभाग नक्की नव्हता, पण त्याने १३ ‘एस’ मारताना दोन तासांत सामना जिंकला.

ब्रिटनच्या योहाना काँटाला तैवानच्या ह्‌सिह स्यू-वेई हिने हरविले. काँटाला सातवे मानांकन होते, तर ह्‌सिह १०९ व्या क्रमांकावर आहे. ह्‌सिहने ‘टॉप टेन’मधील प्रतिस्पर्धीला कारकिर्दीत प्रथमच हरविले. ती ३१ वर्षांची आहे. दुसऱ्या मॅच पॉइंटवर तिने विजय नोंदविला. पहिला सेट एकाच गेमच्या मोबदल्यात २४ मिनिटांत जिंकलेल्या काँटासाठी हा निकाल धक्कादायक ठरला.

इतर प्रमुख निकाल (पहिली फेरी) ः पुरुष एकेरी ः हिऑन चुंग (कोरिया) विवि सॅम क्‍युरी (अमेरिका २७) ६-४, ३-६, ६-३, ६-३. डेनिस इस्तोमीन (उझबेकिस्तान) विवि एर्नेस्टो एस्कोबेडो (अमेरिका) ७-६ (७-३), ६-३, ६-४. महिला एकेरी ः एलिना स्विटोलिना (युक्रेन ५) विवि यारोस्लावा श्वेडोवा (कझाकिस्तान) ६-४, ६-३. कॅरोलिन गार्सिया (फ्रान्स २८) विवि नाओ हिबिनो (जपान) ६-२, ६-२. मॅडिसन किज (अमेरिका १२) विवि ॲश्‍लेघ बार्टी (ऑस्ट्रेलिया) ६-३, ६-२.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: French Open news tennis