पॅरिस - दीर्घकालीन प्रतिस्पर्धी रॉजर फेडरर नसला तरी रोलाँ गॅरोवरील फ्रेंच ओपनचे विजेतेपद गोडच असेल, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया स्पेनचा ‘क्ले कोर्ट सम्राट’ रॅफेल नदाल याने व्यक्त केली. मोसमातील दुसरी ग्रॅंड स्लॅम स्पर्धा रविवारपासून सुरू होत आहे.

गतविजेत्या नदालला फेडरर याचा सहभाग आहे की नाही याची फारशी फिकीर नाही. ११वे फ्रेंच जेतेपद मिळविण्यावर त्याने लक्ष केंद्रित केले आहे. फेडररने गेल्या वर्षी भाग घेतला नव्हता. तेव्हा जिंकलेले आणि आताचे संभाव्य जेतेपद त्यामुळे कमी महत्त्वाचे ठरेल का, या प्रश्नावर नदालने स्पष्ट केले, की ‘प्रामाणिकपणे सांगायचे तर जेतेपद तेवढेच महत्त्वाचे असेल. मला दुखापत झाली असताना २००९ मध्ये फेडरर, तर २०१६ मध्ये जोकोविचने मिळविलेले विजेतेपद तेवढे सुंदर नाही असे मी म्हणू शकत नाही. माझ्यादृष्टीने तसे योग्य ठरणार नाही. प्रमुख खेळाडू नसणे ही स्पर्धेसाठी वाईट बातमी आहे, माझ्यासाठी नव्हे.’
सेरेनामुळे दक्ष राहू - वॉझ्नीयाकी
महिला एकेरीत सेरेना विल्यम्सच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष असेल. जागतिक क्रमवारीत घसरण झाली असली, तरी तिच्या पुनरागमनाकडे प्रतिस्पर्धी गांभीर्याने पाहात आहे. याविषयी डेन्मार्कच्या ऑस्ट्रेलियन विजेत्या कॅरोलीन वॉझ्नीयाकीची प्रतिक्रिया बोलकी ठरली. ती म्हणाली, की सेरेना मानांकित नसली तरी प्रतिस्पर्ध्यांवर दडपण आणेल, त्यामुळे आम्हाला दक्ष राहावे लागेल आणि खेळ उंचावण्याची गरज असेल.