भारताच्या करमन कौर थंडीचा सनसनाटी विजय !!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 December 2016

पुणे - डेक्कन जिमखाना क्‍लब आयोजित सोळाव्या पंचवीस हजार डॉलरच्या एनईसीसी आयटीएफ महिला टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेत भारताच्या करमन कौर थंडीने रशियाच्या ऍनास्तासिया गासनोव्हाचा 6-2, 1-6, 6-2 असा पराभव करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. भारताच्या निधी चिलुमला व नताशा पलाह यांचे एकेरीतील आव्हान आज संपुष्टात आले.

पुणे - डेक्कन जिमखाना क्‍लब आयोजित सोळाव्या पंचवीस हजार डॉलरच्या एनईसीसी आयटीएफ महिला टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेत भारताच्या करमन कौर थंडीने रशियाच्या ऍनास्तासिया गासनोव्हाचा 6-2, 1-6, 6-2 असा पराभव करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. भारताच्या निधी चिलुमला व नताशा पलाह यांचे एकेरीतील आव्हान आज संपुष्टात आले.

डेक्कन जिमखाना क्‍लबच्या टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या मुख्य फेरीत ड्रॉमध्ये वाइल्ड कार्डद्वारे स्पर्धेत प्रवेश केलेल्या करमन कौर थंडीने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. काल करमनने आठव्या मानांकित व युक्रेनच्या व्हलेरिया स्टारकोव्हाचा 2-6, 6-2, 6-4 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदविला होता. आज करमनने आपला फॉर्म कायम राखत रशियाच्या ऍनास्तासिया गासनोव्हाचा 6-2, 1-6, 6-2 असा पराभव केला. दोन तास चाललेल्या या सामन्यात करमनने बेस लाइनवरून अचूक खेळ करताना ऍनास्तासियावर वर्चस्व गाजवले.

रशियाच्या ऍनास्तासिया प्रिबायलोव्हाने पाचव्या मानांकित व जपानच्या अकिता शिहीहोचा 6-7 (11), 6-1, 6-4 असा पराभव केला. दुसऱ्या मानांकित स्लोव्हाकियाच्या तामरा झिदानसेकने ऍना व्हसेलिनोव्हीकचा 6-1, 1-6, 6-3 असा पराभव केला.
पात्रता फेरीतून मुख्य फेरीमध्ये आलेल्या निधी चिलुमला आणि वाइल्ड कार्डद्वारे स्पर्धेत प्रवेश केलेल्या भारताच्या नताशा पलाह यांचे एकेरीतील आव्हान आज संपुष्टात आले. अग्रमानांकित कोने पेरीनने निधीचा 6-2, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. रशियाच्या पोलिना मोनोव्हा हिने नताशाचे आव्हान 6-2, 6-4 असे परतावून लावले.

निकाल असे : एकेरी : नोवोप्पान लेत्चीकारन (थायलंड) वि.वि. चेइ-युहू (ताईपाई) 6-1, 6-4;
कॅटी डुने (इंग्लड) वि.वि. व्हालेन्टायना इव्हाकिनोको (रशिया) 7-5, 6-1; कोनी पेरीन (स्विर्झलंड)
वि.वि. निधी चिलीमुला (भारत) 6-2, 6-2; पोलिना मोनोव्हा (रशिया) वि.वि. नताशा पलाह (भारत) 6-2, 6-4; तामरा झिदानसेक (स्लोव्हाकिया) वि.वि. ऍना व्हसेलिनोव्हीक (एमएनई) 6-1, 1-6, 6-3; ऍनास्तासिया प्रिबायलोव्हा (रशिया) वि.वि. अकिता शिहीहो(जपान) 6-7 (11), 6-1, 6-4; अकिकोअमेई (जपान) वि.वि. सॅन्ड्रा समेर (इजिप्त) 6-4, 3-0 सामना सोडून दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India Kerman Kaur