सानिया-बार्बराचे आव्हान संपुष्टात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 March 2017

इंडियन वेल्स, कॅलिफोर्निया - भारताची सानिया मिर्झा आणि चेक प्रजासत्ताकाची बार्बरा स्ट्रीकोवा यांचा इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. तैवानची युंग-जॅन चॅन आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या जोडीने त्यांना 6-4, 6-4 असे हरविले. हा सामना एक तास 20 मिनिटे चालला. चॅन-हिंगीस यांनी 14 पैकी सात ब्रेकपॉइंट जिंकले, तर दहापैकी पाच वाचविले. पहिल्या सेटमध्ये त्यांनी सानिया-बार्बराला चौथे, तर प्रतिस्पर्धी जोडीला सहावे मानांकन होते. सानिया-बार्बरा यांनी सात वेळा, तर चॅन-हिंगीस यांनी पाच वेळा सर्व्हिस गमावली. सानिया यानंतर मायामीतील स्पर्धेत भाग घेईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian wells tennis competition sania mirza and barbora strycova