विंबल्डनमध्ये फेडररचा धक्कादायक पराभव 

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जुलै 2018

केविनने बेस लाइनवरील सुरेख खेळ केला. मी तसा खेळ करू शकलो नाही. कारकिर्दीमधील हा एक कठीण क्षण निश्‍चित आहे. पण, मी पुढील वर्षी पुन्हा येईन. 
- रॉजर फेडरर 

विंबल्डन : दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसन याने विंबल्डन टेनिस स्पर्धेत बुधवारी सर्वांत सनसनाटी निर्णयाची नोंद करताना रॉजर फेडररचे आव्हान संपुष्टात आणले. त्याने मॅरेथॉन लढतीत फेडररचा 2-6, 6-7(5-7), 7-5, 6-4, 13-11 असा पराभव केला. 

पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत फेडररला पहिले दोन सेट जिंकल्यानंतरही पराभवाचा सामना करावा लागला. आठव्या मानांकित अँडरसनने 4 तास 13 मिनिटांच्या लढतीनंतर फेडररवर मात केली. फेडरर 2013 नंतर प्रथमच विंबल्डन स्पर्धेतून उपांत्यपूर्व फेरीतच बाद झाला. फेडररला 2013 मध्ये दुसऱ्याच फेरीत पराभव पत्करावा लागला होता. 

अँडरसनच्या झंझावती सर्व्हिसचा सामना करताना फेडररला अडचणी येत होत्या. अँडरसन याने 28, तर फेडररने 16 बिनतोड सर्व्हिस केल्या. 

केविनने बेस लाइनवरील सुरेख खेळ केला. मी तसा खेळ करू शकलो नाही. कारकिर्दीमधील हा एक कठीण क्षण निश्‍चित आहे. पण, मी पुढील वर्षी पुन्हा येईन. 
- रॉजर फेडरर 

काय बोलावे, हेच कळत नाही. रॉजर फेडररवर विंबल्डनमध्ये विजय मिळवू शकलो, याचा खूप आनंद आहे आणि तो कायम आठवणीत राहील. या विजयाने आत्मविश्‍वास उंचावला असून, रविवारी अंतिम फेरी खेळेन, असे वाटते. 
-केविन अँडरसन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kevin Anderson beat Roger Federer in Wimbledon tennis