मॅरेथॉन लढत जिंकत अॅंडरसन विम्बल्डनच्या अंतिम फेरीत

वृत्तसंस्था
शनिवार, 14 जुलै 2018

विम्बल्डन स्पर्धेत शुक्रवारी (13 जुलै) झालेल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या केविन अॅंडरसन याने अमेरिकेच्या जॉन इस्नर याला 6 तास 36 मिनिटात झुंजवत दमदार विजय मिळवला. याविजयासह त्याने कारकिर्दीत पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली. 

लंडन : विम्बल्डन स्पर्धेत शुक्रवारी (13 जुलै) झालेल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या केविन अॅंडरसन याने अमेरिकेच्या जॉन इस्नर याला 6 तास 36 मिनिटात झुंजवत दमदार विजय मिळवला. याविजयासह त्याने कारकिर्दीत पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली. 

ऑल इंग्लंड क्वबच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात अॅंडरसनने इस्नरला पाच सेटमध्ये 7-6, 6-7, 6-7, 6-4, 26-24 असे पराभूत केले. तब्बल साडेसहा तास चाललेल्या या सामन्याचा शेवटचा सेट सुमारे दोन तास 50 मिनिटे चालला. यापूर्वी इस्नरने 2010मध्ये निकोलस माहुटला तब्बल 11 तास पाच मिनिटे चाललेल्या सामन्यात पराभूत केले होते. या सामन्याला विम्बल्डन इतिहासात 'एन्डलेस मॅच' असे संबोधले जाते. 

32 वर्षीय अॅंडरसनने अंतिम फेरीत प्रवेश केल्यामुळे तब्बल 97 वर्षांनंतर अंतिमफेरी गाठणारा तो दक्षिण आफ्रिकेचा पहिला खेळाडू ठरला आहे. 

Web Title: Kevin Anderson reaches Wimbledon final after beating John Isner