esakal | पेस-हिंगीस जोडी उपांत्यपूर्व फेरीत
sakal

बोलून बातमी शोधा

पेस-हिंगीस जोडी उपांत्यपूर्व फेरीत

पेस-हिंगीस जोडी उपांत्यपूर्व फेरीत

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा
मेलबर्न - लिअँडर पेसने स्वित्झर्लंडची जोडीदार मार्टिना हिंगीस हिच्या साथीत ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्यांनी कॅसी डेल्लाक्विया-मॅट रीड या ऑस्ट्रेलियन जोडीचा 6-2, 6-3 असा पराभव केला. पेस-हिंगीसने दुसऱ्या फेरीचा सामना 54 मिनिटांत जिंकला. पहिल्या सेटमध्ये त्यांनी कॅसीची सर्व्हिस चौथ्या गेममध्ये भेदली. 5-2 अशा आघाडीनंतर त्यांनी पुन्हा कॅसीच्या सर्व्हिसवर यशस्वी आक्रमण करीत 24 मिनिटांत पहिला सेट जिंकला. हिंगीसने बेसलाइनला; तर पेसने नेटजवळ सरस खेळ केला. दुसऱ्या सेटमध्ये त्यांनी आठव्या गेममध्ये ब्रेक मिळविला.