esakal | लिअँडर पेस १२ वर्षांनी आशियाई स्पर्धा खेळणार
sakal

बोलून बातमी शोधा

leander paes

लिअँडर पेस १२ वर्षांनी आशियाई स्पर्धा खेळणार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली - आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात अनुभवी लिअँडर पेसचे १२ वर्षांनी पुनरागमन झाले असून, ग्रॅंड स्लॅम स्पर्धेतील सहभागासाठी युकी भांब्रीला आशियाई स्पर्धेत सहभागी न होण्याची सूट देण्यात आली आहे.

भारतीय टेनिस संघटनेने (एआयटीए) सोमवारी भारतीय संघ जाहीर केला.
पेसने आतापर्यंत आशियाई क्रीडा स्पर्धेत आठ पदकांची कमाई केली आहे. दोहा २००६ स्पर्धेत महेश भूपतीच्या साथीत दुहेरी आणि सानिया मिर्झाच्या साथीत मिश्र दुहेरीत सुवर्णपदक मिळविल्यापासून पेस या स्पर्धेत खेळलेला नाही. 
भारतीय टेनिसपटू अभावानेच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत खेळताना दिसतात. युकीला अमेरिकन ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत खेळण्याची संधी असल्यामुळे आम्ही त्याला आशियाई स्पर्धेत न खेळण्याची सूट दिल्याचे ‘एआयटीए’ने स्पष्ट केले. 
झिशान अली आणि अंकिता भांब्री यांच्याकडे अनुक्रमे पुरुष आणि महिला संघाचे प्रशिक्षकपद सोपविण्यात आले आहे. 

संघ - पुरुष - रामकुमार रामनाथन, प्रज्ञेश गुणेश्‍वरन, सुमीत नागल, लिअँडर पेस, रोहन बोपण्णा, दिवीज शरण महिला ः अंकिता रैना, कारमन कौर ठंडी, रुतुजा भोसले, प्रांजला याडलापल्ली, रिया भाटिया, प्रार्थना ठोंबरे.