व्हिनसची वाटचाल काँटाकडून खंडित

पीटीआय
Saturday, 1 April 2017

मायामी, फ्लोरिडा - ब्रिटनच्या योहाना काँटाने मायामी ओपन महिला टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या व्हिनस विल्यम्सची घोडदौड ६-४, ७-५ अशी खंडित केली. याबरोबरच तिने अंतिम फेरी गाठली. 

मायामी, फ्लोरिडा - ब्रिटनच्या योहाना काँटाने मायामी ओपन महिला टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या व्हिनस विल्यम्सची घोडदौड ६-४, ७-५ अशी खंडित केली. याबरोबरच तिने अंतिम फेरी गाठली. 

आता तिच्यासमोर डेन्मार्कच्या कॅरोलीन वॉझ्नीयाकीचे आव्हान असेल. वॉझ्नीयाकीने द्वितीय मानांकित चेक प्रजासत्ताकाच्या कॅरोलीना प्लिस्कोवा हिचा प्रतिकार ५-७, ६-१, ६-१ असा मोडून काढला. काँटाने आत्मविश्‍वासाने सुरवात केली. पहिल्याच गेममध्ये तिने व्हिनसची सर्व्हिस भेदली. आक्रमक खेळाच्या जोरावर तिने पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये व्हिनसने ३-१ अशी आघाडी घेतली होती, पण काँटाने पुढच्याच गेममध्ये ब्रेक मिळविला. त्यानंतर आणखी एका ब्रेकसह तिने ५-४ अशी आघाडी घेतली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Miami Open women's tennis