अनमोल, अथर्व, आर्यन, चिनारचा मुख्य फेरीत प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 December 2016

पुणे - हिलसाइड जिमखाना आयोजित २९ व्या प्रवीण करंडक राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेत अनमोल नागपुरे, अथर्व मोरे, चिनार देशपांडे आणि आर्यन हूडने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश मिळविला. 

पुणे - हिलसाइड जिमखाना आयोजित २९ व्या प्रवीण करंडक राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेत अनमोल नागपुरे, अथर्व मोरे, चिनार देशपांडे आणि आर्यन हूडने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश मिळविला. 

बिबवेवाडी येथील हिलसाइड जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम पात्रता फेरीत मुंबईच्या सिद्धांत विनोदने आपलाच शहर सहकारी केवल किरपेकरचा चुरशीच्या लढतीत ९-५ असा पराभव केला. पुण्याच्या अनमोल नागपूरने नाशिकच्या अद्वैत भातखंडेचा, पुण्याच्या अथर्व मोरेने मुंबईच्या आर्यमन जजोदियाचा आणि पुण्याच्या चिनार देशपांडेने मुंबईच्या हुनर बेदीचा ९-३ असा पराभव केला तर पुण्याच्या आर्यन हुडने सुधांशू बनसोडेवर ९-० असा सरळ विजय मिळवला. 

पात्रता फेरीचे निकाल असे : अनमोल नागपुरे (पुणे) वि.वि. अद्वैत भातखंडे (नाशिक) ९-३, अथर्व मोरे (पुणे) वि.वि. आर्यमन जजोदिया (मुंबई) ९-३, आर्यन हूड (पुणे) वि.वि. सुधांशू बनसोडे (पुणे) ९-०, सिद्धांत विनोद (मुंबई) वि.वि. केवल किरपेकर (मुंबई) ९-५, सुधांशू सावंत (पुणे) वि.वि. वेड ठाकूर ९-१, चिनार देशपांडे (पुणे) वि.वि. हुनर बेदी (मुंबई) ९-३. 

मानस धामणे, समीक्षा श्रॉफला अग्रमानांकन 
या स्पर्धेत मुलांच्या गटात मानस धामणे आणि मुलींच्या गटात समीक्षा श्रॉफला अग्रमानांकन देण्यात आले आहे. मानांकन असे ः मुले ः मानस धामणे, काहीर वारिक, जैष्णव शिंदे, प्रज्ज्वल तिवारी, आर्यन देवकर, अंशुल सातव (सर्व महाराष्ट्र), मोहित रेड्डी (तेलंगण), ओमर सुमार (महाराष्ट्र). मुली : समीक्षा श्रॉफ, सायना देशपांडे, अन्या जेकब, मधुरिमा सावंत, श्रावणी खवळे, ईशान्या हतनकर, त्रिशा मिश्रा, परी चव्हाण (महाराष्ट्र).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: National Ranking Tennis Tournament