नोव्हाक जोकोविचची आगेकूच

वृत्तसंस्था
Friday, 17 August 2018

मॅसन, ओहायो - सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने फ्रान्सच्या ॲड्रीयन मॅन्नारीनो याचे आव्हान पहिल्या सेटच्या पिछाडीनंतर ४-६, ६-२, ६-१ असे परतवून लावले. जोकोविचला दहावे मानांकन आहे.

सामन्यादरम्यान त्याला पोटदुखीमुळे त्रास झाला. त्यामुळे दुसऱ्या सेटदरम्यान त्याला डॉक्‍टरकडून उपतार करून घ्यावे लागले. निर्णायक सेटमध्ये त्याने ५-० अशा आघाडीसह पकड भक्कम केली. अलेक्‍झांडर झ्वेरेवचे आव्हान संपुष्टात आले. रॉबिन हासीने त्याला ५-७, ४-६, ७-५ असा धक्का दिला. हासी क्रमवारीत ५५व्या, तर अलेक्‍झांडर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Novak Djokovic beat Adrian Mannarino