esakal | मायामी टेनिसमध्ये व्हिनससह अझारेन्का उपांत्यपूर्व फेरीत
sakal

बोलून बातमी शोधा

मायामी टेनिसमध्ये व्हिनससह अझारेन्का उपांत्यपूर्व फेरीत

मायामी टेनिसमध्ये व्हिनससह अझारेन्का उपांत्यपूर्व फेरीत

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मायामी - व्हिनस विल्यम्स आणि व्हिक्‍टोरिया अझारेन्का यांनी मायामी टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. व्हिनसने गतविजेत्या योहाना कोंटा हिचा ५-७, ६-१, ६-२ असा पराभव केला. ही लढत २ तास १९ मिनिटे चालली. अझारेन्काने अचूक खेळ करत ॲग्निएस्का रॅंडवन्स्का हिचा ६-२, ६-२ असा सहज पराभव केला. अन्य लढतीत पाचवी मानांकित कॅरोलिना प्लिस्कोवा, स्लोआनी स्टिफन्स यांनीही आपली आगेकूच कायम राखली.