esakal | माँटो कार्लो टेनिस स्पर्धेत रॅफेल नदालचे विजेतेपद
sakal

बोलून बातमी शोधा

Rafael Nadal wins title

माँटो कार्लो टेनिस स्पर्धेत रॅफेल नदालचे विजेतेपद

sakal_logo
By
वृत्तसंस्था

माँटो कार्लो - रॅफेल नदालने माँटो कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेतील आपली हुकूमत रविवारी पुन्हा एकदा दाखवून दिली. अंतिम फेरीत त्याने जपानच्या निशिकोरीचा ६-३, ६-१ असा सहज पराभव केला. स्पर्धेतील विजेतेपदाबरोबर नदालने मास्टर्स विजेतेपदाचाही विक्रम आपल्या नावावर नोंदवला. क्‍ले कोर्टवर त्याने ३६वा विजय नोंदवला. आता पुढील आठवड्यात होणाऱ्या बार्सिलोना ओपन विजेतेपदावर त्याचे लक्ष असेल. त्याने ही स्पर्धाही आतापर्यंत दहा वेळा जिंकली आहे. नदालच्या धडाक्‍यासमोर आज निशिकोरी जराही टिकू शकला नाही.