रोहन बोपण्णा-पाब्लो क्‍युएवास दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत

पीटीआय
Saturday, 22 April 2017

मोनॅको - भारताचा रोहन बोपण्णाने सहकारी पाब्लो क्‍युएवासच्या साथीत माँटो कार्लो टेनिस स्पर्धेत दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्यांनी पाचवा मानांकित रावेन क्‍लासेन-राजीव राम जोडीचे आव्हान तीन सेटच्या झुंजीत ६-७(६-८ः, ६-४, १०-६ असे मोडून काढले. त्यांची गाठ आता अव्वल मानांकित हेन्‍री कोन्टिनेन-जॉन पीअर्स जोडीशी पडणार आहे. त्यांनी नोव्हाक जोकोविच-व्हिक्‍टर ट्रॉइचकी जोडीचे आव्हान ६-३, ६-४ असे मोडून काढले. क्‍युएवासची जोडी केल्यानंतर बोपण्णा पाचवी स्पर्धा खेळत असून, आतापर्यंत त्यांची हीच सर्वोत्तम कामगिरी आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohan Bopanna