भारताच्या साकेत मायनेनीची रशियाच्या युझ्नीशी सलामी 

वृत्तसंस्था
Sunday, 1 January 2017

चेन्नई : भारताचा एकेरीतील अव्वल टेनिसपटू साकेत मायनेनी याची चेन्नई ओपन एटीपी टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत रशियाच्या मिखाईल युझ्नीशी लढत होईल. उद्यापासून ही स्पर्धा सुरू होत आहे. 

एकेरीत साकेतला वाइल्ड कार्ड देण्यात आले आहे. युझ्नी 34 वर्षांचा असून, त्याला सातवे मानांकन आहे. 29 वर्षांच्या साकेतने सांगितले, की या लढतीत चांगले आव्हान असेल. युझ्नी हा चांगला खेळाडू आहे. मी माझा सर्वोत्तम खेळ करेन. युझ्नी पूर्वी या स्पर्धेत खेळला आहे. त्यामुळे त्याला वातावरणाची माहिती आहे. 

रामकुमार 22 वर्षांचा आहे. कोइमतूरमध्ये मोसमपूर्व सराव केल्याचे त्याने सांगितले. 

या स्पर्धेत क्रोएशियाच्या मरिन चिलीच याला अग्रमानांकन आहे. स्पेनच्या रॉबर्टो बौटीस्टा आगुटला दुसरे, स्पेनच्या अल्बर्ट विनोलास रॅमोसला तिसरे, तर स्लोव्हाकियाच्या मार्टिन क्‍लिझॅनला चौथे मानांकन आहे. 

पेसचा जोडीदार ब्राझीलचा 
दुहेरीत लिअँडर पेस ब्राझीलच्या आंद्रे सा याच्या साथीत सहभागी होईल. त्यांना तिसरे मानांकन आहे. त्यांच्यासमोर पुरव राजा-दिवीज शरण या भारतीय जोडीचे आव्हान असेल. पेसने येथे सहा वेळा विजेतेपद मिळविले आहेत. पाच वेळा महेश भूपती त्याचा जोडीदार होता, तर एकदा सर्बियाच्या यांको टिप्सारेविच याच्या साथीत तो जिंकला. रोहन बोपण्णाने जीवन नेदुंचेझीयन याच्या साथीत भाग घेतला आहे. त्यांच्यासमोर मार्सेलो डेमोलायनर (ब्राझील) आणि निकोला मेक्‍टीच (क्रोएशिया) यांचे आव्हान असेल. मानांकनानुसार निकाल लागले तर पेस-आंद्रे विरुद्ध बोपण्णा-जीवन असा उपांत्य सामना होऊ शकतो. दुहेरीत रामकुमार रामनाथन-साकेत मायनेनी यांना वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळाला आहे. त्यांची स्टीव डार्सिस (बेल्जियम)-बेनोईट पैरे (फ्रान्स) यांच्याशी लढत आहे. एन. श्रीराम बालाजी-विष्णू वर्धन यांना सुद्धा वाइल्ड कार्ड मिळाले आहे. त्यांची स्वीडनच्या योहान ब्रुनस्ट्रॉम-अँड्रीयस सिल्जेस्ट्रॉम यांच्याशी सलामी आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saket Mayneni to face russian opponent in Chennai Open Tennis