सानिया मिर्झाचा महिला दुहेरीतही पराभव

वृत्तसंस्था
Wednesday, 7 September 2016

न्यूयॉर्क - भारताची सानिया मिर्झा हिला अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीपाठोपाठ महिला दुहेरीतही पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 

सानिया व बार्बोरा स्ट्रायकोव्हा या जोडीचा अव्वल मानाकिंत कॅरोलीन गार्सिया आणि गॅब्रीएला डाबरोवस्की यांनी 6-7 (3), 1-6 असा सहज पराभव केला. सानियाच्या या पराभवामुळे या स्पर्धेतील भारतीय टेनिसपटूंचे आव्हान संपुष्टात आले आहे. सानियाने मिश्र दुहेरीत क्रोएशियाच्या इव्हान डॉडीग याच्या साथीत भाग घेतला होता. त्यांना मिश्र दुहेरीत बार्बरा क्रेजसीकोवा (चेक)-मरीन ड्रॅगाना (क्रोएशिया) या जोडीने त्यांना दुसऱ्याच फेरीत 6-3, 6-4 असे हरविले.

महिला दुहेरीत सानियाला जागतिक क्रमावारीत अव्वल मानांकन आहे. गेल्या मोसमातील दुहेरीतील यशस्वी जोडीदार मार्टिना हिंगीस बरोबरची जोडी तुटल्यानंतर सानिया चेक प्रजासत्ताकची बार्बोरा स्ट्रायकोवा हिच्यासोबत खेळत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sania Mirza lost in Women's tennis in US Open Tennis