सानिया-मार्टिनाची उपांत्य फेरीत धडक

वृत्तसंस्था
Friday, 28 October 2016

सिंगापूर : भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांनी मोसमाच्या अखेरच्या डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धेत दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. शुक्रवारी त्यांनी तैवानच्या हाओ चिंग चान-युंग यान चॅन जोडीचे आव्हान 7-6(12-10), 7-5 असे परतवून लावले. या वर्षी जुलैमध्ये सानिया-मार्टिना जोडी फुटली होती. त्यानंतर प्रथमच त्या एकत्र खेळत होत्या.

उपांत्य फेरीत आता त्यांची गाठ अव्वल मानांकित कॅरोलिन गार्सिया-क्रिस्तिना म्लाडेनोविच आणि बेथानी माटेक सॅंड्‌स-ल्युसी सॅफारोवा यांच्यातील विजेत्या जोडीशी पडणार आहे.

सानिया आणि मार्टिना यांना पहिल्या सेटमध्ये कडवा प्रतिकार करावा लागला. दोन्ही जोड्यांनी या सेटमध्ये एकही सर्व्हिस गमावली नाही. सेटमध्ये 5-5 अशी बरोबरी असताना अकराव्या गेमला सानिया-मार्टिनाची सर्व्हिस भेदली गेली; पण हाओ-युंग यांना हा आनंद फार काळ अनुभवता आला नाही. सानिया आणि मार्टिना यांनी बाराव्या गेमला ब्रेकची संधी साधली आणि सेट टायब्रेकमध्ये नेला. टायब्रेकमध्येदेखील सानिया-मार्टिना यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. तीन सेट पॉइंट वाचवल्यानंतर त्यांना पहिला सेट जिंकता आला.

दुसऱ्या सेटमध्येही सानिया-मार्टिना यांच्या अनुभवाची कसोटी लागली. हा सेटही बरोबरीतच सुरू होता. दहाव्या गेमला सानिया-मार्टिना यांना ब्रेकची संधी मिळाली. ही संधी साधून त्यांनी आपली सर्व्हिस राखत उपांत्य फेरीतील आपला प्रवेश निश्‍चित केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sania Mirza Martina Hingis reach semi-finals