टेनिस लीगमध्ये सेरेना, निशिकोरी सहभागी

वृत्तसंस्था
Friday, 25 November 2016

नवी दिल्ली - आगामी आंतरराष्ट्रीय प्रीमियर टेनिस लीगमध्ये अमेरिकेची मातब्बर सेरेना विल्यम्स आणि जपानचा केई निशिकोरी यांचा सहभाग असेल. फेडरर, नदाल, अँडी मरे आणि जोकोविच यांच्यापैकी एकच खेळाडू खेळेल; पण त्याचे नाव अद्याप नक्की नाही. पुढील महिन्यात हैदराबादला अंतिम टप्पा होईल, अशी माहिती संयोजक महेश भूपती याने दिली. लीगमधील सहभागी खेळाडूंना मानधन देण्यावरून कोणताही वाद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षी जपानकडून खेळलेला लिअँडर पेस यंदा नसेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Serena Tennis League