esakal | सेरेना विल्यम्सचीच सरशी; व्हिनसचा पराभव
sakal

बोलून बातमी शोधा

Serena Williams

सेरेना विल्यम्सचीच सरशी; व्हिनसचा पराभव

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मेलबर्न - अमेरिकेच्या सेरेना आणि व्हिनस या विल्यम्स भगिनींमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या विजेतेपदासाठी झालेल्या लढतीत सेरेना विल्यम्सने बाजी मारली.

सेरेनाने आज (शनिवार) झालेल्या अंतिम सामन्यात व्हिनसचा 6-4, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सेरेनाने आतापर्यंत व्हिनसविरुद्धच्या लढतीत सर्वाधिक यश मिळविलेले आहे. या अंंतिम सामन्यातही सेरेनानीच सरशी झाली.

उपांत्य फेरीत धाकट्या सेरेनाने दोन सेटमध्येच बाजी मारली; तर थोरल्या व्हिनसला तीन सेटपर्यंत संघर्ष करावा लागला होता. सेरेनाने क्रोएशियाच्या मिर्याना ल्युचिच-बॅरोनीचे आव्हान 6-2, 6-1 असे परतावून लावले; तर व्हिनसने देशभगिनी कोको वॅंडेवेघेवर 6-7 (3-7), 6-2, 6-3 अशी मात केली होती. आता अंतिम लढतीतही सेरेनाने सुरवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व राखत दोन्ही सेट 6-4, 6-4 असे जिंकले.


विल्यम्स भगिनी आमनेसामने
- 1998 च्या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत विल्यम्स भगिनींमध्ये पहिलावहिला सामना.
- त्या वेळी व्हिनसची दोन सेटमध्ये सरशी
- ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विल्यम्स भगिनी नवव्यांदा आमनेसामने
- 2009 च्या विंबल्डन स्पर्धेनंतर प्रथमच हा योग, तेव्हा सेरेनाचा विजय
- आतापर्यंत नऊ लढतींत सेरेना सात विजयांसह आघाडीवर
- आजवरच्या 28 लढतींत सेरेनाचे 17, व्हीनसचे 11 विजय

सेरेना
- कारकिर्दीतील 23 वे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद
- व्यावसायिक युगात विश्‍वविक्रम
- तिशीनंतर दहा ग्रॅंड स्लॅम विजेतीपदे

व्हीनस
- आठ वर्षांनंतर ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत
- 2011 ते 14 दरम्यान व्हीनस एकाही ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत चौथ्या फेरीच्या पुढे नाही
- 2015 मध्ये याच स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठल्यापासून पुनरागमन