गुडघा दुखापतीमुळे सानियाची ऑस्ट्रेलियन स्पर्धेतून माघार

वृत्तसंस्था
Sunday, 17 December 2017

नवी दिल्ली - दुखावलेल्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्यामुळे सानिया मिर्झाने पुढील महिन्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. गुडघ्यातील काही स्नायू फाटले असल्याची शक्‍यता आहे.

अशा दुखापतीतून सानिया रॉजर फेडररसारखी पुनरागमनाची अपेक्षा बागळून आहे. मी सध्या व्यवस्थित चालू शकते; परंतु खेळताना गुडघ्यातून वेदना होतात, असे सानियाने म्हटले आहे. अशा प्रकारची काहीशी गंभीर दुखापत होणार याचे संकेत मला मिळत होते. आता मी काही महिने तरी टेनिसपासून दूर राहणार हे निश्‍चित आहे, असे सध्या जयदीप मुखर्जी टेनिस अकादमीत असलेल्या सानियाने सांगितले.

काही महिने विश्रांती घे आणि त्यानंतर गुडघा पुन्हा तपासू. कदाचित शस्त्रक्रिया करावी लागणार नाही. केवळ इंजेक्‍शनने बरे होईल, असे मला डॉक्‍टरांनी सांगितले; परंतु दोन महिन्यांनंतरही वेदना कमी झाल्या नाहीत, अशी खंत सानियाने व्यक्त केली.

अधिक धोका पत्करण्यापेक्षा ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेतून माघार घेणे योग्य ठरेल, असा निर्णय घेतल्याचे सानियाने सांगितले. पुढील वर्षात होणाऱ्या राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत खेळणार का? या प्रश्‍नावर ती म्हणते, तोपर्यंत मी पूर्ण तंदुरुस्त होईन, अशी आशा आहे. टेनिसपटू त्यांच्या दुखापतीसंदर्भात काहीच ठामपणे सांगू शकत नाही, असे मी भविष्यातील स्पर्धांविषयी विचारले जाते तेव्हा सांगत असते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports new sania mirza tennis knee