एटीपी टेनिस स्पर्धा चेन्नईतून पुण्यात!

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 16 July 2017

मुंबई/पुणे - भारतामधील एकमेव एटीपी टेनिस स्पर्धा पुढील वर्षापासून महाराष्ट्रात होईल. ‘महाराष्ट्र ओपन’ म्हणून ओळखली जाणारी स्पर्धा पुण्यात होईल. राज्य सरकारच्या पाठिंब्यामुळे ‘एमएसएलटीए’ने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे यजमानपद पटकावले आहे. पाच वर्षांच्या कराराचा सरकारी आदेश आज शासनाने जारी केला.  

पुण्यात फेब्रुवारीत डेव्हिस करंडक लढतीचे यशस्वी संयोजन झाले. त्यानंतर राज्य सरकारने ‘एमएसएलटीए’चा (महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना) यासंदर्भातील प्रस्ताव मान्य केला. त्यामुळे ‘असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स’ची (एटीपी) ‘२५० सिरीज’ची स्पर्धा पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात होईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष असतील; तर संयोजन समितीचे अध्यक्षपद अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांच्याकडे असेल. गेली २० वर्षे ही स्पर्धा चेन्नईत तमिळनाडू राज्य सरकार आणि तमिळनाडू टेनिस असोसिएशनच्या वतीने होत होती; मात्र यापुढे तमिळनाडूत ही स्पर्धा होणार नाही. त्यामुळे या स्पर्धेची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी, असा प्रस्ताव ‘एमएसएलटीए’ने दिला होता. तो मान्य झाला असून पाच वर्षांसाठी स्पर्धा घेण्याचे नियोजन आहे. 

दृष्टिक्षेपात
महाराष्ट्र ओपनचे संयोजन राज्य सरकार आणि ‘एमएसएलटीए’ करणार
बक्षीस रक्‍कम ‘एमएमआरडीए’ने देण्याची सूचना
इतर खर्च शासकीय व निमशासकीय संस्था, पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, सिडको आदींकडून

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news atp tennic competition in pune