esakal | कश्‍यप, सिरील, ऋत्विका मुख्य फेरीत
sakal

बोलून बातमी शोधा

कश्‍यप, सिरील, ऋत्विका मुख्य फेरीत

कश्‍यप, सिरील, ऋत्विका मुख्य फेरीत

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सिडनी - भारताच्या चारपैकी तीन बिगरमानांकित खेळाडूंनी पात्रता फेरीतून ऑस्ट्रेलिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. यामध्ये पी. कश्‍यप, सिरील वर्मा आणि ऋत्विका गड्डे यांचा समावेश आहे. 

पुरुष एकेरीत भारताच्या पी. कश्‍यप याने प्रथम चीनच्या हाओ जुनपेंगचा २१-१५, २१-१८ असा पराभव केला. त्यानंतर त्याने इंडोनेशिया ओपन स्पर्धेतील उपविजेत्या काझुमसा साकाई याचे आव्हान २१-५, २१-१६ असे संपुष्टात आणले.

त्याच्या पाठोपाठ युवा सिरील वर्मा यानेही मुख्य फेरी गाठली. त्याने इंडोनेशियाच्या येहेझकिएल मेनाकी (२१-९, २१-९) आणि श्रेयश जैस्वाल (२१-१६, २१-१४) यांचा पराभव केला.  महिला एकेरीत ऋत्विका शिवानी गड्डे हिने पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या सिल्विना कुर्निवानचा २१-१५, २१-१५ असा पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या फेरीत तिने आणखी एका ऑस्ट्रेलियाच्या रुविंडी सेरासिंघे हिच्यावर २१-९, २१-७ अशी सहज मात केली.