कॅरोलिना गार्सियाचा हालेपला धक्का

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 October 2017

बीजिंग - जागतिक क्रमवारीत मिळविलेले अव्वल मानांकन सिमोना हालेपला मानवले नाही. बीजिंग टेनिस स्पर्धेत तिला महिला एकेरीचे विजेतेपद गमवावे लागले. फ्रान्सच्या बिगरमानांकित कॅरोलिना गार्सियाने रविवारच्या अंतिम फेरीत तिचा ६-४, ७-६(७-३) असा पराभव केला. गार्सियाने गेल्याच आठवड्यात वुहान ओपन स्पर्धाही जिंकली होती. पुरुष एकेरीत अव्वल मानांकित रॅफेल नदालने या वर्षांतील सहावे विजेतेपद मिळविताना ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसचा ६-२, ६-१ असा पराभव केला. नदालच्या झंझावातासमोर किर्गिओसचा निभावच लागला नाही. त्याने ९२ मिनिटांत लढत जिंकली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news bijing tennis competition