मोक्याच्या वेळी प्रतिकार करीत खेळ उंचावलेल्या सिंधूने जागतिक स्पर्धेतील आव्हान राखले. तिने चेऊंग यि हिला १९-२१, २३-२१, २१-१७ असे पराजित केले. सिंधूच्या खेळात सातत्याचा अभाव होता. पहिला गेम गमावलेल्या सिंधूने दुसऱ्या गेममध्ये प्रतिस्पर्धीस तीन मॅच पॉईंट दिले. निर्णायक गेममध्ये ११-४ आघाडीनंतर १२-१२ अशी बरोबरी स्वीकारली, पण अखेर तिने या ८७ मिनिटे चाललेल्या लढतीत विजय मिळविला.

सुरुवातीपासून अपेक्षित वर्चस्व न मिळाल्याने सिंधू काहीशी अस्वस्थ झाली होती. बेसलाईनवरून विजयी गुण मिळवून प्रतिस्पर्धी दडपण आणण्यात सिंधूला अपेक्षित यश नव्हते. अर्थात दुसऱ्या गेमच्या अंतिम टप्प्यात मोक्याच्यावेळी सावरत साधलेली बरोबरी तिच्या पथ्यावर पडली. त्याच जोरावर तिने निर्णायक गेममध्ये अडखळत्या सुरुवातीनंतर सात गुणांची आघाडी घेतली होती. याच गेमच्या अंतिम टप्प्यात प्रतिस्पर्धीला चुका करण्यास सिंधूने भाग पाडले. भारतीय चाहत्यांना श्वास रोखून धरण्यास भाग पाडलेल्या या लढतीत सिंधूने अडखळत, पण मोक्याच्यावेळी हल्ला करीत विजय मिळविला.