पॅरिस - स्पेनच्या रॅफेल नदाल याची पुन्हा एकदा जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानावर वर्णी लागली आहे. मायामी टेनिस स्पर्धेत रॉजर फेडररला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात अपयश आल्याने नदालचा अव्वल स्थानाचा मार्ग मोकळा झाला होता. फेडरर दुसऱ्या स्थानावर आला आहे. दोघांच्या गुणात आता फक्त १० गुणांचा फरक आहे. फेडररला हरवणारा आणि पुढे या स्पर्धेचे विजेतेपद मिळविणारा जॉन इस्नेर नवव्या स्थानावर आला आहे. क्रमवारी (अनुक्रमे पहिला दहा) रॅफेल नदाल, रॉजर फेडरर, मरिन चिलीच, ॲलेक्झांडर झ्वेरेव, ग्रिगॉर दिमित्राव, ज्युआन मार्टिन डेल पोट्रो, डॉमिनिक थिएम, केविन अँडरसन, जॉन इस्नेर, डेव्हिड गॉफिन.