अर्जुन, जयेशची विजयी सलामी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 September 2017

चेन्नई - पुण्याच्या अर्जुन कढे आणि जयेश पुंगलिया यांनी आयटीएफ टेनिस फ्युचर्स ग्रेड ८ स्पर्धेत विजयी सलामी दिली. अर्जुनने आर्यन गवसला ६-४, ६-४ असे हरविले. अर्जुनला मुख्य ड्रॉमध्ये वाइल्ड कार्ड मिळाले आहे. या संधीचा पुरेपूर फायदा त्याने घेतला हा सामना दीड तास चालला. 

जयेशने तैवानच्या सिंग-यांग मेंग याचे चिवट आव्हान ६-३, ३-६, ६-४ असे परतवून लावले. हा सामना दोन तास तीन मिनिटे चालला. जयेशने पात्रता फेरीतून आगेकूच केली आहे. सहाव्या मानांकित हादीन बावा याने दक्षिणेश्वर सुरेश याचा ६-४, ७-६ (७-३) असा पराभव केला. तेजस चौकुळकरचे आव्हान संपुष्टात आले. पाचव्या मानांकित मेक्‍सिकोच्या ल्युकास गोमेझने त्याला ६-४, ६-२ असे हरविले. दुहेरीत अर्जुन-ऋषभदेव रमण यांच्यासमोर उपांत्यपूर्व फेरीत द्वितीय मानांकित तैवानच्या यू ह्‌सियांग चू- जुई-चेन हुंग यांचे आव्हान असेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news ITF tennis comeptition