ऋतुजा दुसऱ्या फेरीत; स्नेहल मुख्य स्पर्धेत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

शर्म अल शेख - ऋतुजा भोसलेने आयटीएफ टेनिस स्पर्धेच्या दोन्ही गटांत विजयी सलामी दिली. एकेरीत तिने आठव्या मानांकित इजिप्तच्या ओला अबौझेक्रीला ६-१, ६-४ असा धक्का दिला. दुहेरीत तिने इजिप्तच्या मायार शेरीफच्या साथीत नादिया एचेवेरीया आलम (व्हेनेझुएला)-क्‍लेमेन्स फायोल (फ्रान्स) यांना ६-३, ६-१ असे हरवून उपांत्यपूर्व फेरी गाठली. स्नेहल माने हिने पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत प्रवेश केला. तिला पहिल्या फेरीत बाय मिळाला होता. त्यानंतर तिने इटलीच्या सोफिया रॅगोनाला ६-२, ६-०, तर अर्जेंटिनाच्या आगुस्टीना च्लपॅकला ४-६, ६-३ असे हरविले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news itf tennis competition

टॅग्स