ऋतुजा-अलेक्‍झांड्रा दुहेरीत विजयी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

हुआ हीन (थायलंड) - भारताच्या ऋतुजा भोसलेने ऑस्ट्रेलियाच्या अलेक्‍झांड्रा वॉल्टर्स हिच्या साथीत आयटीएफ टेनिस स्पर्धेच्या दुहेरीत विजयी सलामी दिली. या जोडीला द्वितीय मानांकन आहे. त्यांनी थायलंडच्या चंता औन्चीसा-थित्रात कानाफुएत यांना ६-१, ६-३ असे हरविले. 

प्रतिस्पर्धी जोडीला वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळाला होता. हा सामना ५८ मिनिटे चालला. उपांत्यपूर्व फेरीत ऋतुजा-अलेक्‍झांड्राची चीनच्या झौमा नी मा-मी झौमा यू यांच्याशी लढत होईल. एकेरीच्या दुसऱ्या फेरीत ऋतुजासमोर द्वितीय मानांकित थायलंडच्या बुयावी थामचावात हिचे आव्हान असेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news ITF tennis competition