esakal | रॉजर फेडररवर डेल पोट्रोचा विजय
sakal

बोलून बातमी शोधा

रॉजर फेडररवर डेल पोट्रोचा विजय

रॉजर फेडररवर डेल पोट्रोचा विजय

sakal_logo
By
वृत्तसंस्था

इंडियन वेल्स, कॅलिफोर्निया - अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोट्रो याने इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्याने मातब्बर रॉजर फेडररला ६-४, ६-७ (८-१०), ७-६ (७-२) असे हरविले. फेडररला मोसमात प्रथमच पराभूत व्हावे लागले. डेल पोट्रोने तब्बल तीन मॅचपॉइंट वाचविले. २५ सामन्यांत त्याने सातव्यांदाच फेडररला हरविले. कारकिर्दीत एटीपी मास्टर्स १००० मालिकेतील स्पर्धा त्याने प्रथमच जिंकली.

उभय खेळाडू मास्टर्स १००० मालिकेतील निर्णायक सामन्यांत प्रथमच आमनेसामने आले होते. या मालिकेत २००४ पासून १४ पैकी १३ स्पर्धा फेडरर, रॅफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच यांनी जिंकल्या होत्या. डेल पोट्रोला अंतिम फेरीत तीन वेळा पराभूत व्हावे लागले होते. २००९ ला माँट्रीएलमध्ये अँडी मरे, २०१३ मध्ये या स्पर्धेत नदाल, तर त्याच वर्षी शांघायमध्ये जोकोविच यांच्याकडून तो हरला होता.

डेल पोट्रो २९ वर्षांचा आहे. तो म्हणाला, की  फेडररला अंतिम फेरीत हरविणे ही सोपी कामगिरी नाही. हा विजय फार मोठा आहे.