पेसचा उपांत्य फेरीत प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 June 2017

लंडन - अग्रमानांकित लिअँडर पेसने कॅनडाचा जोडीदार आदिल शमास्दीन याच्या साथीत इल्कली एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. या जोडीने आंद्रे वॅसिलेवस्की-हॅन्स पॉडलीप्नीक कॅस्टीलो यांच्यावर ७-६ (७-१), ६-२ अशी मात केली. 

द्वितीय मानांकित दिवीज शरण-पुरव राजा यांचे आव्हान संपुष्टात आले. थायलंडच्या सांचाई-सोंचात या रतीवाताना बंधूंनी त्यांना ६-२, ६-४ असे हरविले.पेस-आदिल यांनी पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या मॅट रीड आणि जॉन-पॅट्रिक स्मिथ यांच्यावर ४-६, ६-३, १२-१० अशी मात केली. पुरव-दिवीज यांनी व्हिक्‍टर एस्ट्रेला बरगॉस (डॉमिनीकन प्रजासत्ताक)-डॅरियन किंग (बार्बाडोस) यांना ६-२, ६-४ असे हरविले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news leander paes in semi-finals