esakal | माझी कारकीर्दच बोलकी - पेस

बोलून बातमी शोधा

माझी कारकीर्दच बोलकी - पेस
माझी कारकीर्दच बोलकी - पेस
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोलकता - डेव्हिस करंडक लढतीसाठी संघात पुन्हा निवड झाली नसली, तरी लिअँडर पेसचा निवृत्तीचा कोणताही विचार नाही. आपली कारकीर्दच बोलकी असून आता कुणालाही काहीही सिद्ध करून दाखविण्याची गरज नसल्याचे वक्तव्य भारताच्या या दुहेरीतील दिग्गज टेनिसपटूने केले.

डेव्हिस करंडक दुहेरीत ४२ विजयांचा विक्रम तो आणि इटलीचे निकोला पित्रांजेली यांच्या नावावर संयुक्तरीत्या आहे. हा विक्रम मोडण्याच्या संधीसाठी त्याची प्रतीक्षा मात्र लांबत चालली नाही. पुण्यात न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत तो विष्णू वर्धन याच्या साथीत हरला. त्यानंतर उझबेकीस्तानविरुद्धच्या लढतीसाठी कर्णधार महेश भूपती यांनी त्याची निवड केली नाही.