बघदातीसने युकीला हरविले

पीटीआय
Tuesday, 16 January 2018

मेलबर्न - भारताच्या युकी भांब्रीला माजी उपविजेत्या मार्कोस बघदातीसविरुद्ध ६-७ (४-७), ४-६, ३-६ असे पराभूत व्हावे लागले. जागतिक क्रमवारीत युकी १२२व्या, तर बघदातीस १०३व्या स्थानावर आहे. दोन तास नऊ मिनिटे चाललेल्या लढतीत युकीला सोपे फटके चुकल्याचा फटका बसला. 

अशा चुका त्याच्याकडून ३३ वेळा घडल्या. दुसरीकडे बघदातीसच्या केवळ तीन चुका झाल्या. युकीने अनेकवेळा नेटजवळ धाव घेतली, पण बघदातीस प्रामुख्याने बेसलाइनवरून खेळला. युकीने पात्रता फेरीतून आगेकूच केली होती. यापूर्वी त्याने २०१५ व १६ मध्ये पात्रता फेरीतून प्रवेश केला होता. १५ मध्ये अँडी मरे, तर १६ मध्ये तो टोमास बर्डीच यांच्याकडून हरला होता. या वेळी युकीला तुलनेने चांगली संधी होती. पहिल्याच गेममध्ये त्याने ब्रेकही मिळविला होता, पण चौथ्या गेममध्ये त्याने सर्व्हिस गमावली. तेव्हा वारा जोरात वाहत होता. त्यामुळे दोन्ही खेळाडूंना सफाईने खेळणे अवघड जात होते. त्यानंतर पुढील दोन गेममध्ये दोघांनी ब्रेक नोंदविले. नवव्या गेममधील ब्रेकसह युकीने आघाडी घेतली होती. मग सेट जिंकण्यासाठी सर्व्हिस राखण्याची गरज असताना तो ढेपाळला. टायब्रेकमध्ये त्याने ३-१ अशी आघाडी घेतली होती, पण त्यानंतर त्याला चुकांचा फटका बसला. दुसऱ्या सेटमध्ये युकीने ४-४ अशा स्थितीस सर्व्हिस गमावली. त्यावेळी युकीने खेळावर नियंत्रण मिळविले होते, पण बघदातीसचा अनुभव मोलाचा ठरला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news Marcos Baghdatis Yuki Bhambri