ग्रॅंड स्लॅम विजेते रोझ यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचे दोन ग्रॅंड स्लॅम आणि डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धा विजेते माजी खेळाडू मर्विन रोझ यांचे मंगळवारी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. डाव्या हाताने खेळणाऱ्या रोझ यांनी १९५४ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि १९५८ मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती. याखेरीज त्यांनी दुहेरीत पाच ग्रॅंड स्लॅम विजेतीपदे मिळविली आहेत. ऑस्ट्रेलियाने १९५१ आणि ५७ मध्ये विजेतेपद मिळविलेल्या डेव्हिस करंडक संघाचेही ते सदस्य होते. निवृत्तीनंतर त्यांनी मार्गारेट कोर्ट, बिली जिन किंग आणि अरांता सॅंचेझ व्हिकारियो याटेनिसपटूंना मार्गदर्शन केले होते.

Web Title: sports news marvin ross death