विंबल्डनमध्ये जोकोविचला दुसरे मानांकन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 June 2017

लंडन - तीन वेळच्या विंबल्डनविजेत्या नोव्हाक जोकोविचला जागतिक क्रमवारीतील स्थान चौथ्या क्रमांकापर्यंत घसरल्यानंतरही विंबल्डन स्पर्धेत दुसरे मानांकन देण्यात आले आहे. स्पर्धेसाठी मानांकन देताना सात वेळच्या विजेत्या रॉजर फेडररला देखील फायदा झाला आहे.

लंडन - तीन वेळच्या विंबल्डनविजेत्या नोव्हाक जोकोविचला जागतिक क्रमवारीतील स्थान चौथ्या क्रमांकापर्यंत घसरल्यानंतरही विंबल्डन स्पर्धेत दुसरे मानांकन देण्यात आले आहे. स्पर्धेसाठी मानांकन देताना सात वेळच्या विजेत्या रॉजर फेडररला देखील फायदा झाला आहे.

ऑल इंग्लंड क्‍लबने बुधवारी स्पर्धेसाठी मानांकने जाहीर केली. गतविजेता ब्रिटनचा अँडी मरे आणि जर्मनीची एंजेलिक केर्बर यांना अनुक्रमे पुरुष आणि महिला गटातून अव्वल मानांकन देण्यात आले आहे. एटीपी क्रमवारीला प्रथमच बगल देऊन यंदा पुरुष विभागातील मानांकने निश्‍चित करण्यात आली. 

गेल्याच महिन्यात फ्रेंच ओपन स्पर्धेत दहावे विजेतेपद मिळविणाऱ्या रॅफेल नदाल याला जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान असूनही विंबल्डनमध्ये या वेळी चौथे मानांकन देण्यात आले आहे. दोन वेळे येथे विजेतेपद मिळविणारा नदाल २०११ पासून या स्पर्धेत चौथ्या फेरीच्या पुढे गेलेला नाही. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असणाऱ्या फेडररला तिसरे मानांकन देण्यात आले आहे. त्यामुळे किमान उपांत्य फेरीपर्यंत कुठल्याही मातब्बर खेळाडूशी त्याची गाठ पडणार नाही. स्टॅन वाव्रींका पाचव्या स्थानावर आहे. 

महिला विभागात मात्र डब्ल्यूटीएचे मानांकन काटेकोरपणे पाळण्यात आले आहे. एंजेलिक केर्बर पाठोपाठ रुमानियाच्या सिमोना हालेप हिला दुसरे मानांकन देण्यात आले आहे. चेक प्रजासत्ताकची कॅरोलिना प्लिस्कोवा, युक्रेनची एलिना स्विटोलिना आणि डेन्मार्कची कॅरोलिन वॉझ्नियाकी अशा पहिल्या पाच खेळाडू आहेत.

मानांकन यादी -
पुरुष - १) अँडी मरे (ब्रिटन), २) नोव्हाक जोकोविच (सर्बिया), ३) रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड), ४) रॅफेल नदाल (स्पेन), ५) स्टॅन वाव्रींका (स्वित्झर्लंड), ६) मिलोस राओनिच (कॅनडा), ७) मरिन चिलीच (क्रोएशिया), ८) डॉमिनिक थिएम (ऑस्ट्रिया), ९) केई निशिकोरी (जपान), १०) ॲलेक्‍झांडर झ्वेरेव (जर्मनी)

महिला - १) एंजेलिक केर्बर (जर्मनी), २) सिमोना हालेप (रुमानिया), ३) कॅरोलिना प्लिस्कोवा (चेक प्रजासत्ताक), ४) एलिना स्विटोलिन (युक्रेन), ५) कॅरोलिन वॉझ्नियाकी (डेन्मार्क), ६) योहाना कोंटा (ब्रिटन), ७) स्वेटलेना कुझ्नेत्सोवा (रशिया), ८) डॉमिनिका शिबुल्कोवा (स्लोव्हाकिया), ९) ॲग्निस्का रॅडवन्स्का (पोलंड), १०) व्हीनस विल्यम्स (अमेरिका)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news novak djokovic second rating in wimbledon