नोव्हाक जोकोविचचा प्रदर्शनी स्पर्धेत विजय

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 January 2018

मेलबर्न - सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने विजयी पुनरागमन केले आहे. त्याने कुयाँग क्‍लासिक प्रदर्शनी स्पर्धेत ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थीमला ६-१, ६-४ असे हरविले. सहा महिन्यांच्या ब्रेकनंतर जोकोविच कोर्टवर उतरला होता. थीम जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे. जोकोविचची १४व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा सहा वेळा जिंकली आहे. त्याला गेल्या आठवड्यात अबुधाबीतील स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. उजव्या कोपराच्या दुखापतीमुळे त्याला गेल्या मोसमात ब्रेक घ्यावा लागला होता. 

जोकोविच म्हणाला की, मला पुनरागमनास प्रदीर्घ वेळ लागला; पण तुमच्या हातात काही नसते. तुम्ही केवळ प्रयत्नच करू शकता. दुखापत ही व्यावसायिक क्रीडापटूचा सर्वांत मोठा शत्रू असते. सुरवात चांगली झाली. माझे टेनिसवर प्रेम आहे. माझी खेळावर फार निष्ठा आहे. इतके दिवस मी यास मुकत होतो.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news novak djokovic win