esakal | किर्गीऑसची नदालवर मात
sakal

बोलून बातमी शोधा

मॅसन, ओहायो - रॅफेल नदालविरुद्ध चुरशीच्या रॅलीत गुण जिंकल्यानंतर जिगर दर्शविताना ऑस्ट्रेलियाचा नीक किर्गीऑस.

किर्गीऑसची नदालवर मात

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

उपांत्य फेरीत धडक, आता फेररचे आव्हान
मॅसन, ओहायो - ऑस्ट्रेलियाच्या नीक किर्गीऑसने सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेत स्पेनच्या रॅफेल नदालला ६-२, ७-५ असे पराभूत केले. याबरोबरच किर्गीऑसने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

नदालचा पराभव अनपेक्षित ठरला. रॉजर फे

डररच्या माघारीमुळे त्याचे क्रमवारीतील अव्वल स्थान नक्की झाले. प्रमुख खेळाडूंच्या माघारीमुळे विजेतेपदाची सर्वाधिक संधी त्याला होती; पण किर्गीऑसने दहा मिनिटांत दुहेरी ब्रेक मिळविला. त्याने ४-० अशी आघाडी घेतली. पहिला सेट त्याने २५ मिनिटांत जिंकला. त्याने सर्व्हिसवर केवळ तीन गुण गमावले. दुसऱ्या सेटच्या पाचव्या गेममध्ये त्याने नदालची सर्व्हिस भेदली. दहाव्या गेममध्ये तिसऱ्या मॅचपॉइंटला त्याच्याकडून डबल फॉल्ट झाली. नदालने मग ब्रेक मिळविला; पण किर्गीऑसने पुन्हा ब्रेक नोंदविला. त्याने दहाव्या बिनतोड सर्व्हिसवर विजय नक्की केला. त्याने एक तास २० मिनिटांत सामना जिंकला. याबरोबरच नदालविरुद्ध त्याने दोन विजय- दोन पराभव अशी समान कामगिरी साधली.

माझी सुरवात खराब झाली. मी चांगला खेळ करू शकलो नाही, तर नीकसारख्या खेळाडूविरुद्ध जिंकू शकत नाही. मी सबब देऊ शकत नाही.
- रॅफेल नदाल

नदालविरुद्ध सेंटर कोर्टवर खेळण्याची संधी मिळालेल्या तरुणाचा खेळ सर्वोत्तमच व्हायला हवा. अशा कामगिरीमुळे प्रगती होते.
- नीक किर्गीऑस