मरे, वाव्रींकाची आगेकूच

पीटीआय
Friday, 9 June 2017

पॅरिस - जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या ब्रिटनच्या अँडी मरे याने पाचव्यांदा फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. त्याची गाठ आता स्टॅन वाव्रींका याच्याशी होणार आहे.

एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत अँडी मरे याने जपानच्या केई निशिकोरी याचा कडवा प्रतिकार २-६, ६-१, ७-६(७-०), ६-१ असा मोडून काडला. मरे गेल्या वर्षी येथे उपविजेता होता. 

निशिकोरी याने गेल्या वर्षी अमेरिकन ओपन स्पर्धेत पाच सेटच्या लढतीत मरे याच्यावर मात केली होती. मात्र, त्याची पुनरावृत्ती करण्यात त्याला अपयश आले. पहिला सेट निशिकोरीने जिंकल्यानंतर उत्सुकता वाढली हाती. मात्र, मरेने दुसरा सेट सहज जिंकून बरोबरी साधली. तिसरा सेट त्याने टायब्रेकमध्ये जिंकला. चौथ्या सेटमध्ये पुन्हा त्याने निशिकोरीवर वर्चस्व राखले. 

माजी विजेत्या स्टॅन वाव्रींकाने दुसऱ्या लढतीत मरिन चिलीचचे आव्हान ६-३, ६-३, ६-१ असे संपुष्टात आणले. स्पर्धेच्या इतिहासात ३२ वर्षीय वाव्रींका या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा सर्वाधिक वयस्कर खेळाडू ठरला आहे. या स्पर्धेची तिसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठतना वाव्रींका एकही सेट हरलेला नाही.

ओस्टापेन्को अंतिम फेरीत
लॅटवियाच्या जेलेना ओस्टापेन्को हिने वाढदिवस साजरा करताना स्वित्झर्लंडच्या तिमेआ बासिन्झकी हिचे आव्हान ७-६(७-४), ३-६, ६-३ असे परतवून लावत महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली. ग्रॅंड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी ओस्टापेन्को लॅटवियाची पहिली खेळाडू ठरली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news tennis Murray Wavrinka