हॅरिसन-व्हीनस पुरुष दुहेरीत विजेते

पीटीआय
सोमवार, 12 जून 2017

पॅरिस - अमेरिकेचा रायन हॅरिसन आणि न्यूझीलंडचा मायकेल व्हीनस यांनी यंदाच्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळविले. अंतिम फेरीत त्यांनी मेक्‍सिकोचा सॅंटिआगो गोन्झालेझ आणि अमेरिकेचा डोनाल्ड यंग जोडीचा ७-६(७-५), ६-७(४-७), ६-३ असा पराभव केला. व्हीनस आणि हॅरिसन याच वर्षी एकत्र आले असून, त्यानी गेल्या महिन्यात इस्टोरिल स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते.

महिला दुहेरीत अव्वल मानांकित बेथानी माटेक सॅंड्‌स आणि ल्युसी सॅफारोवा यांनी विजेतेपद मिळविले. त्यांनी बिगरमानांकित ॲशलेघ बार्टी-कॅसे डेलाक्वा जोडीचे आव्हान ६-२, ६-१ असे सहज संपुष्टात आणले. बेथानी-सॅफारोवा यांनी या वर्षी ऑस्ट्रेलियन स्पर्धा देखील जिंकली असून, हे त्यांचे पाचवे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news tennis RYAN HARRISON, MICHAEL VENUS