टूरवर एकत्र खेळणे आवश्‍यक - विजय अमृतराज

वृत्तसंस्था
बुधवार, 21 मार्च 2018

नवी दिल्ली - डेव्हिस करंडक जागतिक पुरुष सांघिक टेनिस स्पर्धेच्या दुहेरीतील खेळाडू टूरवर एकत्र खेळत नसतील तर यश मिळणे कठीण असते, असे मत माजी कर्णधार विजय अमृतराज यांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली - डेव्हिस करंडक जागतिक पुरुष सांघिक टेनिस स्पर्धेच्या दुहेरीतील खेळाडू टूरवर एकत्र खेळत नसतील तर यश मिळणे कठीण असते, असे मत माजी कर्णधार विजय अमृतराज यांनी व्यक्त केले.

चीनविरुद्धच्या लढतीसाठी ‘आयटा’ने (अखिल भारतीय टेनिस संघटना) क्रमवारीनुसार अव्वल खेळाडू रोहन बोपण्णा नाखूश असूनही त्याची मोट अनुभवी लिअँडर पेसबरोबर बांधली आहे. समन्वयाची भावना नसलेल्या दोन खेळाडूंची जोडी जमविणे चांगली कल्पना आहे का? या प्रश्नावर विजय म्हणाले, की मला ठाऊक नाही पण टूरवर एकत्र खेळणाऱ्यांना या स्पर्धेतही सरस संधी असते. अर्थात यावरून फार वाद होऊ नये, कारण डेव्हिस करंडकात एकेरीचे सामनेसुद्धा असतात.

बोपण्णा व पेस टूरवर वेगवेगळ्या जोडीदारांसह खेळतात, पण विजय यांच्यासाठी हा दुय्यम विषय आहे. ते म्हणाले, की एकेरीच्या चार सामन्यांना प्राधान्य असले पाहिजे. जागतिक गटात स्थान मिळविणे आणि तेथे चांगली कामगिरी करणे आपले ध्येय आहे. त्यासाठी आपल्याला टॉप फिफ्टीमधील खेळाडूंची गरज आहे. इतर सर्व मुद्द मागे पडतील. दुहेरीचा वाद हा राईचा पर्वत करण्याचा प्रकार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news Vijay Amritraj tennis