esakal | मरे, त्सोंगा, नदाल विजयी
sakal

बोलून बातमी शोधा

मरे, त्सोंगा, नदाल विजयी

मरे, त्सोंगा, नदाल विजयी

sakal_logo
By
पीटीआय

लंडन - संभाव्य विजेते अँडी मरे, रॅफेल नदाल यांच्यासह  फ्रान्सच्या ज्यो-विल्फ्रीड त्सोंगा याने विंबल्डनच्या पुरुष एकेरीत विजयी सलामी दिली. 

नदालने ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमन याचा ६-१, ६-३, ६-२ असा पराभव केला.  मरेने कझाकिस्तानच्या अॅलेक्‍झांडर बब्लीक याचा ६-१, ६-४, ६-२ असा पराभव केला. त्सोंगाने ब्रिटनच्या कॅमेरॉन नॉरीवर ६-३, ६-२, ६-२ अशी मात केली. 

नॉरीचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला. त्याचे वडील स्कॉटलंडचे, तर आई वेल्सची आहे. त्याचे बालपण न्यूझीलंडमध्ये गेले. तो अमेरिकेत राहतो. जागतिक क्रमवारीत तो २२१व्या स्थानावर आहे. त्याला वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळाला होता. ग्रॅंड स्लॅम स्पर्धेतील त्याचे पदार्पण मात्र प्रभावी ठरले नाही. त्सोंगा ग्रास कोर्टवर जोरदार खेळ करतो. पहिले पाच गेम दोघांनी सर्व्हिस राखली. त्यानंतर २-३ अशा स्थितीस नॉरीला कमकुवत व्हॉलीचा फटका बसला. त्याची सर्व्हिस खंडित झाली. त्यानंतर त्याने पुन्हा सर्व्हिस गमावली. त्सोंगाने ३२ मिनिटांत आघाडी घेतली. 

दुसऱ्या सेटमध्ये त्सोंगाने जोरदार सर्व्हिस केली. हा सेट २५ मिनिटे चालला. त्यानंतर तिसरा सेट त्सोंगाने तसाच एकतर्फी ठरविला. १२वे मानांकन असलेल्या त्सोंगाने आरामात दुसरी फेरी गाठली.महिला एकेरीत द्वितीय मानांकित सिमोना हालेप हिने न्यूझीलंडच्या मरिना एराकोवीच हिचे आव्हान ६-४, ६-१ असे परतावून लावले.

पेट्रा क्विटोवाने स्वीडनच्या योहाना लार्सनला ६-३, ६-४ असे हरविले. व्हिनस विल्यम्सने बेल्जियमच्या एलिसी मेर्टेन्सला ७-६ (९-७), ६-४ असे पराभूत केले.

किर्गीऑसची माघार
दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या नीक किर्गीऑसला माघार घ्यावी लागली. त्याच्या कंबरेला दुखापत झाली आहे. फ्रान्सच्या पिएर ह्युजेस हर्बर्ट याच्याविरुद्ध तो ३-६, ४-६ असा पिछाडीवर होता. त्सोंगाने ६० टक्केच तंदुरुस्त असल्याचे स्पर्धेपूर्वी सांगितले होते. सामन्यादरम्यान त्याची दुखापत चिघळली. या दुखापतीमुळे किर्गीऑसला रोम मास्टर्स स्पर्धेतूनही माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर फ्रेंच ओपनमध्ये त्याला दुसऱ्या फेरीत पराभूत व्हावे लागले होते. विंबल्डनपूर्वी क्वीन्स क्‍लब स्पर्धेत तो पडला. 

अन्य निकाल एकेरी
पुरुष : केई निशीकोरी वि.वि. मार्को सेशिनाटो ६-२, ६-२, ६-०, रॉबर्टो बौटिस्टा आगुट वि.वि.  अँड्रियस हैडर मौरेेर ६-३, ६-१, ६-२, सॅम क्युरी .िव. वि. थॉमस फॅबियानो ७-६ (७-५), ७-५, ६-२, 

महिला : फ्रान्सिस्का शियावोनी वि.वि. मँडी मिनेला ६-१, ६-१, एलेना स्विटोलिना वि.वि. ॲश्‍लेग बार्टी ७-५, ७-६ (१०-८)