सिडनी टेनिस स्पर्धेत सानियाला उपविजेतेपद

पीटीआय
Saturday, 14 January 2017

सिडनी - सानिया मिर्झाला चेक प्रजासत्ताकाची जोडीदार बार्बरा स्ट्रीकोवा हिच्या साथीत सिडनी आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत व्हावे लागले. टिमीया बॅबोस (हंगेरी)-अनास्ताशिया पावल्यूचेन्कोवा (रशिया) या जोडीने त्यांना ६-४, ६-४ असे हरविले. या पराभवामुळे मोसमाच्या प्रारंभी सलग दुसऱ्या स्पर्धेत विजेतेपद मिळविण्यात सानियाला अपयश आले. गेल्या आठवड्यात तिने ब्रिस्बेनमधील स्पर्धेत अमेरिकेच्या बेथानी मॅट्‌टेक सॅंड्‌स हिच्या साथीत विजेतेपद मिळविले होते. सानिया-बार्बरा यांना अग्रमानांकन होते. त्या मोसमात प्रथमच एकत्र खेळत होत्या. अंतिम सामना एक तास १२ मिनिटे चालला.

सिडनी - सानिया मिर्झाला चेक प्रजासत्ताकाची जोडीदार बार्बरा स्ट्रीकोवा हिच्या साथीत सिडनी आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत व्हावे लागले. टिमीया बॅबोस (हंगेरी)-अनास्ताशिया पावल्यूचेन्कोवा (रशिया) या जोडीने त्यांना ६-४, ६-४ असे हरविले. या पराभवामुळे मोसमाच्या प्रारंभी सलग दुसऱ्या स्पर्धेत विजेतेपद मिळविण्यात सानियाला अपयश आले. गेल्या आठवड्यात तिने ब्रिस्बेनमधील स्पर्धेत अमेरिकेच्या बेथानी मॅट्‌टेक सॅंड्‌स हिच्या साथीत विजेतेपद मिळविले होते. सानिया-बार्बरा यांना अग्रमानांकन होते. त्या मोसमात प्रथमच एकत्र खेळत होत्या. अंतिम सामना एक तास १२ मिनिटे चालला. दुसऱ्या सेटमध्ये सानिया-बार्बराची सर्व्हिस तीन वेळा खंडित झाली. या तुलनेत त्यांना एकच ब्रेक मिळविता आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sydney tennis tournament Sania